नांदोस येथे वीज वाहिनीवर विद्युत पुरवठा खंडीत

युवकांच्या मदतीने वीजपुरवठा सुरळीत

ठाकरे गट शिवसेना ग्रा. प. सदस्य वंदेश ढोलम व युवासैनिक यांचा पुढाकार

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील नांदोस येथे काल शुक्रवारी संध्याकाळी विद्युत वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्यामुळे कट्टा गोकुळआळी परिसरात व बाजारपेठेतील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. नागरीकांनी वीज कर्मचाऱ्यांना संपर्क साधून समस्या सांगितली असता. त्यांनी नागरीकांनी सहकार्य केल्यास आज विद्युतपुरवठा सुरळीत करता येइल अन्यथा उद्या म्हणजे शनिवार दुपार पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होइल असे सांगितले त्यावर वायरमनच्या आवाहनाची तात्काळ दखल घेऊन ठाकरे गट शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य वंदेश ढोलम , समीर माळवदे , निखिल बांदेकर, किरण वाईरकर, उपेंद्र बोडये, सिद्धार्थ हिरवे, दर्शन म्हाडगुत यांनी वीज कर्मचाऱ्यांसोबत जंगल भागात जाऊन विद्युत वाहिनीवरील फांदी बाजूला करण्यास मदत केली. यावेळी वीज कर्मचारी गणेश वारंग, मोहाळे व वायंगणकर यांनी युद्धपातळीवर रात्री 8 वाजेपर्यंत अतिशय कठीण भागात काळोखात काम करून कट्टा गोकुळ आळी व बाजारपेठ परीसरातील वीजपुरवठा सुरळीत केला. सदर विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे कट्टा गोकुळआळी व बाजारपेठ परिसरात वीजेच्या समस्येबरोबरच शुक्रवार आणि शनिवारी या वाहिनीवर असलेल्या सार्वजनिक नळयोजनेवरुन पाणीपुरवठा होऊ शकला नसता व पाण्याची समस्या निर्माण झाली असती, व याचा ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असता. त्यामुळे तत्परतेबद्दल ग्रा. सदस्य वंदेश ढोलम आणि युवा सैनिकांचे नागरीकांनी आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!