आमदार नितेश राणेंनी केली आचरा रस्त्यावरील पुरस्थितीची पाहणी

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी आज कणकवलीत दाखल होताच कणकवली आचरा रस्त्यावरील   फणसवाडी येथील पुरस्थितीची पाहणी केली.स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाला दक्षतेबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.नागरिकांना पूरस्थितीत कोणतीही हानी पोचू नये यासाठी सतर्क राहावे काळजी घ्यावी असे सांगितले.यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार रमेश पवार, कणकवली शेतकरी ख वि संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, वरवडे सरपंच करुणा घाडीगांवकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री ,माजी सरपंच इब्राहिम शेख, सिरील फर्नांडिस, सुभाष मालंडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!