उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून जिल्हा रुग्णालयात रुग्णमित्र नियुक्त

भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती जाहीर

ओराेस (प्रतिनिधी) : भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भारतीय जनता पक्षाकडून सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रभारी या नात्याने भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडूनही अनेक कार्यक्रमाच आयोजन कुडाळ व मालवण तालुक्यात करण्यात आल आहे. त्या पैकीच जिल्हा रुग्णालय ओरोस, कुडाळ मध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे रुग्णमित्र नियुक्त करण्यात आले. हे रुग्णमित्र जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयासहित अन्यत्र रुग्णांना सेवा देणार असून जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांच्याशी चर्चा करत निलेश राणे यांनी सर्वतोपती सहकार्य करण्याचे आश्वासन देत सौ. सुप्रिया वालावलकर (रा. ओरोस) व मंगेश प्रभू रा. (तेंडोली) यांची नियुक्ती जाहीर केली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील सर्व परिस्थितीचा आढावा घेत जिल्हा शक्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांच्याशी चर्चा केली. भारतीय जनता पक्षाच्या ह्या उपक्रमाने सर्वच रुग्णांना सरकारी योजनांचा लाभ सुरळीतपणे घेता येईल.

error: Content is protected !!