पुरळमध्ये भर वस्तीत घरातील कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

बिबट्याचा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद ; पुरळ गावात भीतीचे वातावरण

देवगड (प्रतिनिधी) : पुरळमध्ये चक्क घराच्या गॅलरीत उडी घेवून दोनपैकी एका कुत्र्याला बिबट्याने उचलून नेण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून पुरळ गावात या घटनेने सध्या भीतीचे वातावरण आहे.भरवस्तीमध्ये प्रवेश करणा-या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुरळवासियांमधून होत आहे.
पुरळ येथील शैलेश मराठे यांच्या घरासमोरील पुढील गॅलरीत दोन कुत्रे होते.शुक्रवारी रात्री बिबट्याने कुत्रे असलेल्या समोरील गॅलरीत उडी मारली व एका कुत्र्यावर हल्ला केला मात्र दुसèयावर हल्ला करण्याचा प्रयत्न फसला व तो कुत्रा बिबट्याचा तावडीतून सुटला मात्र पहिल्या कुत्र्याला उचलून नेले.ही घटना मराठे यांच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली व हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने बिबट्याचा अशाप्रकारे भरवस्तीमधील एन्टड्ढीने गावात घबरहाट निर्माण झाली असून आतापर्यंत पडेल, पुरळ परिसरात सहा पाळीव कुत्र्यांना बिबट्यांना भक्षय केले आहे.यापुर्वी पडेल येथे दुचाकीस्वारावर उडी घेतल्याची घटना घडली होती.पडेल, पुरळ परिसरात बिबट्याचा या थेट वस्तीमधील वावरामुळे भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!