रायगड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आचरा पोलीस अलर्ट….!

स.पो.नि.अनिल व्हटकर यांनी आचरा पोलिस स्टेशन हद्दितील संवेदनशील गावांची पहाणी करुन ग्रामस्थांनशी केली चर्चा

आचरा (प्रतिनिधी) : आचरा पोलीस ठाणे हद्दीतील डोंगर पायथ्याशी तसेच डोंगरा पासून जवळ असणाऱ्या कुडोपी, बुधवळे, मठ बुद्रूक, किर्लोस, चिंदर व शिरवंडे गावांना आज दुपारच्या सत्रात सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी अक्षय धेंडे, भाबल यांच्या सह भेट दिली. सदर गावातील रहिवाश्यांन बरोबर भुस्खलन नैसर्गिक आपत्ती दरम्यान प्राथमिक दृष्टया करावाच्या उपाययोजना बाबत चर्चा करण्यात केली तसेच प्रत्येक” गावातील पोलीस पाटील यांना गावातील प्रत्येक वाडी प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन ग्रुप तयार करुन धोक्याचा इशारा समजण्याकरिता वाडी मध्ये मध्यभागी भोंगा स्पीकर लावण्याच्या सुचना देण्यात आल्या.
रायगड सारखी दुर्घटना होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय, भुस्तखलन धोकादायक गावांची नावे महसूल विभागाच्या धोकादायक गावांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यास तसेच काही वाड्यांमध्ये आधुनिक साधन सामुग्रीने बचाव कार्य करता येईल याबाबत उपाययोजना करणेसंदर्भात पत्रव्यवहार केल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्हटकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!