चिंदर ग्रामपंचायत येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी….!

आचरा (प्रतिनिधी) : जेष्ठ स्वातंत्र्य क्रांतिकारक, जेष्ठ पत्रकार, निर्भीड वक्ता व स्वातंत्र्य हा माझा जन्म सिध्द हक्क आहे. असे इग्रंजांना सांगत भारतीयांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देणारे बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांची आज जयंती. चिंदर ग्रामपंचायत कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रभारी सरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन लोकमान्य टिळकांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना सुर्वे म्हणाले कि आजच्या काळात युवा पिढीने टिळकांच्या विचाराने चालण्याची गरज आहे. तसेच टिळकांन सारखा स्वाभिमान, अभिमान आपणही अंगी बानवूया.यावेळी चिंदर भटवाडी साजा तलाठी योगेश माळी, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश नाटेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!