जिल्हास्तरीय स्पर्धेत कासार्डेचे खेळाडू अव्वल
तळेरे (प्रतिनिधी): नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच कणकवली काॅलेज कणकवलीच्या एच पी सी एल हाॅल मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या विद्यार्थ्यांनी अभिनंदनीय यश संपादन केले आहे.यशस्वी खेळाडूमधून सात योगा पट्टूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेले आहे.
यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
ट्रॅडिशनल योगा प्रकार:-
9 ते 14 वयोगट (मुली)
कु. दुर्वा पाटील इ. 8 वी ब
द्वितीय क्रमांक (सिल्वर मेडल)
9 ते 14 वयोगट (मुलगे)
1)वृशाल निकम -इ.7वी अ
प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल)
2)शशांत तळेकर -इ. 8 वी ब
तृतीय क्रमांक (ब्रांझ मेडल)
वयोगट 14 ते 18 (मुली)
1) रिया नकाशे,- इ.12 वी (सायन्स)
प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल)
2) सानिका मत्तलवार , इ.12वी (काॅमर्स)
द्वितीय क्रमांक (सिल्वर मेडल)
वयोगट 14 ते 18 ( मुलगे)
मयुर हडशी इ. 10 वी ब
प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल)
आर्टिस्टिक पेअर
1)कु. सानिका मत्तलवार व
2)कु. रिया नकाशे
प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल)
असे एकूण चार गोल्ड, दोन सिल्वर आणि एक ब्रांझ मेडल पटकावले आहे. वरील सर्व स्पर्धकांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक तथा योग प्रशिक्षक संजय भोसले ,विद्यालयाच्या शिक्षिका कु. प्रियांका सुतार व शिरीरिक शिक्षण विभाग प्रमूख श्री मारकड डी.जे. यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे शाळा व्यवस्थापक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.