पक्ष संघटनवाढीसाठी घेतलेल्या निःस्वार्थी मेहनतीची पक्षश्रेष्ठींकडून पोचपावती
देवगड (प्रतिनिधी) : भाजपा पड़ेल मंडल अध्यक्षपदी महेश उर्फ बंड्या नारकर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. पक्ष निरीक्षक मनोज रावराणे यांनी आज बंड्या नारकर यांची निवड जाहीर केली. बंड्या नारकर यांनी आपल्या मागील तालुकाध्यक्षपदाच्या काळात पक्षवाढीसाठी अथक मेहनत घेतली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पडेल मंडल च्या मागील मताधिक्याचा विक्रम मोडीत काढत भाजपाचे मताधिक्य वाढवत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या विजयात वाटा उचलला. पडेल मंडलातील विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकाऱ्यांना स्वपक्षात येण्यासाठी राजी करून भाजपाचा झेंडा अधिक वेगाने फडकावला. बंड्या नारकर यांच्या या कार्याची दखल विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांनीही वेळोवेळी घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. रविवार २० एप्रिल रोजी झालेल्या नूतन तालुकाध्यक्ष निवडीवेळी महेश उर्फ बंड्या नारकर यांच्या नावावर पक्ष निरीक्षक मनोज रावराणे यांच्या उपस्थितीत सर्वांनी शिक्कामोर्तब केले. यावेळी बाळ खडपे,ज़िल्हा बँक संचालक प्रकाश बोडस,अमोल तेली, आरिफ बगदादी,संजय बोंबड़ी,रवि तिर्लोटकर,रामकृष्ण जुवाटकर,अंकुश ठुकरुल,भूषण पोकळे ,अजित राणे,संजय लाड,मकरंद जोशी,संदीप तावड़े,सुनील जाधव,संदीप पुजारे,विश्वनाथ पड़ेलकर,प्रभा वादेकर,महेश पड़वळ,रत्नाकर सर्वनकर, उपस्थित होते.












