कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते विजय ऊर्फ बाबा भाऊसाहेब देसाई (वय ७६) यांचे आज रात्री अल्पशः आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी नऊ वाजता कळंबा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापुरातील भाजपच्या स्थापनेपासूनचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. भाजप कामगार मोर्चाचे ते प्रदेश सरचिटणीस, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्री होते. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ते कायम निमंत्रित सदस्य होते. गोकुळचे माजी संचालकही होते. शाहू मिलमध्ये दीर्घकाळ सेवा बजावली. ते मूळचे पुष्पनगर (ता. भुदरगड) येथील होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, दोन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ‘सकाळ’चे बातमीदार प्रवीण देसाई यांचे ते वडील होत.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांचे निधन










