आचरा (प्रतिनिधी) : चिंदर देऊळवाडी येथील रहिवासी, श्री रामेश्वर वि.का.स.से. सोसायटी चिंदरचे माजी संचालक सुधाकर कोडंस्कर यांचे 19 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या वर देऊळवाडी-कुभांरवाडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते 55 वर्षाचे होते. सामाजिक, धार्मिक कार्यात वाहून घेणार्या सुधाकर यांच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण, काका असा मोठा परिवार आहे.
चिंदर येथील सुधाकर कोंडस्कर यांचे निधन..!











