वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्षपदी सुधीर नकाशे यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका भाजपा मंडल अध्यक्षपदी सुधीर नकाशे यांची सर्वानुमत्ते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी नकाशे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी अरविंद रावराणे, माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, महिला अध्यक्षा प्राची तावडे  नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, माजी नगराध्यक्षा नेहा माईनकर,माजी उपनराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक रणजित तावडे,सुभाष रावराणे,  बंड्या मांजरेकर, रवींद्र रावराणे, अतुल सरवटे,शांतिनाथ गुरव,दत्ताराम मोरे,लहू पवार, अवधूत नारकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना निरीक्षक साटम म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी भाजपा मंडल अध्यक्षांची निवड करण्यात येत आहे. भाजपा हा लोकशाही मानणारा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाच्या धोरणानुसार  वैभववाडी मंडल अध्यक्षांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. नूतन मंडल अध्यक्ष नकाशे पक्ष संघटन मजुबूत करण्यासाठी तळागाळा पर्यंत काम करतील असे सांगत त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच नूतन अध्यक्ष सुधीर नकाशे यांचे भाजपा पदाधिकाऱ्याकडून अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!