होमिओपॅथिक रिसर्च व डेव्हलपमेंट फाऊंडेशन मार्फत आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : ‘होप फॉर होपलेस’ म्हणजे ज्या दिव्यांग मुलांना जीवन जगताना असह्य वेदना होत आहेत ,जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यांच्यासाठी एक आशेचा किरण चे डॉक्टर्स करत आहेत . या विद्यार्थ्यांची ओराग्य तपासणी करून त्यांच्या समस्या जाणून घेवून मोफत औषधे देण्यात आली. अशा दिव्यांग मुलांसाठी प्रत्येकी दोन महिन्यांनी मोफत शिबिर मतिमंद निवासी विद्यालय येथे आयोजित करण्यात येईल , असे आवाहन मुख्याध्यापिका रश्मी सोगम यांनी केले .
तांबे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज मतिमंद निवासी विदयालय करंजे येथील विशेष दिव्यांग विद्यालया-मध्ये होमिओपॅथिक रिसर्च व डेव्हलपमेंट फाऊंडेशन मार्फत घेण्यात आले. त्यामध्ये मानसिक, शारिरीक दिव्यांग मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विशेष मुलांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आला. या मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉ. कविता सावंत, डॉ. दिवाली गुप्ते, डॉ. मयूर गोसावी, डॉ. भैरवी गोसावी यांचे संस्थेच्या व शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ. सोगम यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
या विशेष मुलांसाठी निःशुल्क सेवा उपलब्ध करून देवून पालकांना एक आशेचा किरण दिला आहे. HRDF मार्फत देशभर दिव्यांग मुलांसाठी शिबिरे आयोजित केली जातात, अशा शिबिराचा पालकांनी आपल्या मुलांसाठी लाभ घ्यावा . मोफत आरोग्य शिबिरासाठी 9403369910 , 9920403553 संपर्क साधावा असे आवाहन मुख्याध्यापिका सौ. सोगम यांनी केला आहे.












