जीवन आनंद आश्रमांस केले गरजोपयोगी सहाय्य
खारेपाटण (प्रतिनिधी) : विरार येथील आई भवानी मित्र परिवार आणि मुंबईतील परेल येथील गणेशलीला स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून जीवन आनंद संस्थेच्या आश्रमांसाठी नुकतेच आश्रमांची गरज ओळखून आवश्यक सहाय्य करण्यात आले.गणेशलीला स्पोर्टस् क्लबने स्वःकृषभ शुक्ला यांच्या वाढदिवसा निमित्ताने खाद्योपयोगी तसेच औषधोपयोगी व गरजोपयोगी वस्तूंचे सहाय्य केले.तर आई भवानी मित्र परिवारचे सदस्य असलेले प्रविण लाड ,लवु सांदिम या सदस्यांनी आई भवानी मित्र परिवारकडून आश्रमची गरज समजून घेवून नुकतेच जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य केले.यावेळी कुमार गौरांग लाड याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
जीवन आनंद संस्थेच्या बोरिवली मुंबई येथील हितचिंतक स्नेही निला बोरकर सन्याल यांनीही समर्थ आश्रममधे जेवण बनविण्यासाठी आवश्यक असलेली भांडी व जीवन आवश्यक साहित्य भेट देण्यात आले. आज घडीला रस्त्यावरचं निराधार वंचिततेचं जीवन जगणारी माणसं ही अनेकदा सर्वसामान्य कुटुंबातली माणसं असतात.जीवनातील प्रतिकुल परिस्थीतीमुळे त्यांना रस्त्यावरचे निराधार वंचिततेचे जीवन जगावे लागत असले….विविध कारणांनी असे वंचिततेचे जीवन जगणा-या आणि दारिद्र्याच्या कारणाने कुटुंबासह पदपथावर राहत असलेल्या बांधवांना माणूसकीचे सन्मानजन्य जीवन जगता यावे यासाठी संदिप परब यांनी स्थापन केलेली जीवन आनंद संस्था कार्यरत आहे.
मुंबई ,विरारफाटा, कुडाळ सह गोवा राज्यातील आश्रम,शेल्टर होम आणि डे केअर सेंटर द्वारे हे कार्य गेली दहा वर्षाहून अधिक काळ अविरत सुरू आहे.जीवन आनंद संस्थेचे सर्व आश्रमांतील कार्य हे संस्थेचे सर्व दाते आणि हितचिंतकांच्या सक्रीय सहभागातून सुरू असून संस्थेच्या वातीने सर्वांचे मनःपुर्वक आभार मानण्यात आले.