स्थानिकांची उपाययोजनेची मागणी
नेरुर – सरंबळ रस्त्यावर कलमेवाडी येथील प्रकार
कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नेरुर – सरंबळ रोडवर नागदा मारुती मंदिरापासून काही अंतरावर कलमे वाडी येथे मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी पाऊस गेल्यावरही मोठ्या प्रमाणात बरेच दिवस साचून राहत आहे. ऱस्त्याकडेला गटार नसल्यामुळे आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी इतर कुठलाच मार्ग नसल्यामुळे याठीकाणी पाणी साचत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात दरम्यान येथील स्थानिक रहिवासी श्री. संदेश तोडणकर , श्री. प्रमोद मुंड्ये यांनी यावर ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. बरेच दिवस सुमारे गुडघाभर पाणी साचून राहत असल्यामुळे येथून चालत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना तसेच नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच साचून राहिलेल्या पाण्यात डेंग्यू सारख्या रोगांचा फैलाव करणारे मच्छर किंवा इतर विषाणूंची पैदास होऊन साथरोग फैलाव होऊ शकतात अशी भिती श्री. संदेश तोडणकर यांनी व्यक्त केली आणि साचणाऱ्या पाण्यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.