वेंगुर्ले, देवगड बस स्थानक नूतनीकरण साठी प्रत्येकी 2 कोटी मंजूर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग एसटी विभागातील देवगड आणि वेंगुर्ले बस स्थानकांच्या नूतनीकरण साठी प्रत्येकी 2 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती विभाग नियंत्रक पाटील यांनी दिली. देवगड बस स्थानक 1975-76 साली तर वेंगुर्ले बस स्थानक इमारत बांधकाम 1989-90 साली करण्यात आले होते.दोन्ही बसस्थानक इमारतीची मोठया प्रमाणत दुरावस्था झाली होती.या दोन्ही बसस्थानकांचे गतवर्षी अरीन डिझाईन पुणे या खाजगी कंपनीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते.त्यानुसार नूतनीकरण प्रस्ताव एसटी प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली असून लवकरच निविदा काढून नूतनीकरण काम हाती घेतले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!