वयाेवृद्ध महिला जयश्री साटम खून प्रकरण ; क्रुर प्रवृत्तीविरोधात वैभववाडीवासीय एकवटले

वैभववाडी (प्रतिनिधी) : महीलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात तालुकावासीय एकवटले. यात सर्व पक्षीयांचा समावेश होता. येथील शहरात जोरदार घोषणाबाजी करीत त्या घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. त्यानंतर पोलीस निरीक्षकांशी भेट घेत संशयित आरोपीस अधिकाधिक शिक्षा व्हावी. अशी मागणी पोलीसांकडे केली.

सोनाळी वाणीवाडी येथील जयश्री साटम या महिलेचा मंगळवारी रात्री साडेसात वाजण्यच्या सुमारास निर्घुण खुन करण्यात आला. या प्रकाराने संपुर्ण तालुका हादरून गेला होता. या प्रकरणी संशयित आरोपी सचिन निखार्गे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी येत तपासाविषयी सुचना केल्या होत्या. संशयिताला पोलीसांनी दीड तासांत ताब्यात घेतले होते. या तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. श्रीमती साटम यांची क्रुर पध्दतीने हत्या केली होती. त्यामुळे सर्वच क्षेत्रातुन या घटनेचा निषेध केला जात होता. विविध राजकीय पक्षांनी पोलीसांना निवेदन दिली.

आज सोनाळी, नावळेसह विविध गावांतील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी या क्रुर प्रवृत्तीविरोधात एकवटली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरात निषेध रॅली काढली. यामध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी, प्रमोद रावराणे, अरविंद रावराणे, नेहा माईणकर, संजय सावंत, स्नेहलता चोरगे, प्राची तावडे, भीमराव भोसले, संजय रावराणे, सुनील रावराणे, प्रकाश पाटील, अशोक रावराणे, संभाजी रावराणे, सोनल गुरव, यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!