काळानुरूप महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल महत्त्वाचा – श्रेया नानचे

फोंडा नं. १ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

फोंडाघाट (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त जीवन शिक्षण विद्यामंदिर, फोंडा नं. १ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली पाककला स्पर्धा उत्साहात पार पडली. परिसरातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या पाककला स्पर्धेचा विषय “नाचणीपासून खाद्यपदार्थ तयार करणे” असा होता. सहभागी महिलांनी नाचणीपासून विविध चविष्ट पदार्थ तयार करून आपली पाककलेची कला सादर केली. तसेच प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊ देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

पाककला स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले :
प्रथम क्रमांक : रूपा निलेश सापळे
द्वितीय क्रमांक : स्वप्नाली समाधान वाघमोडे
तृतीय क्रमांक : सुप्रिया गजानन सावंत
उत्तेजनार्थ : विजया लकुळ गोसावी व मृण्मयी दत्तात्रय रेवडेकर

स्पर्धेचे परीक्षण अंगणवाडी सेविका प्रियांका रेवडेकर व वर्षा वायंगणकर यांनी केले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रेया नानचे, उपशिक्षिका वेदांती नारकर व रंजना पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमात पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका श्रेया नानचे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व, महिलांसमोरील सध्याची आव्हाने, तसेच काळानुरूप महिलांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल याबाबत मार्गदर्शन केले. काही महिलांनीही आपले मनोगत व्यक्त करून रंगत वाढवली.

error: Content is protected !!