आ.नितेश राणेंच्या माध्यमातून विजयदुर्ग पोलिसांना रेनकोट वाटप

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिसानिमित्त सामाजिक उपक्रम

देवगड (प्रतिनिधी): भाजपा नेते उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विजयदुर्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांना रेनकोट वाटप करण्यात आले.भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली , सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेनकोट वाटप करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी दिवसरात्र ऑन ड्युटी असतात. पावसापाण्यात खेडोपाडी प्रवास करावा लागतो. अशावेळी त्यांना रेनकोट अत्यावश्यक असतो.पोलीस कर्मचाऱ्यां प्रति कृतज्ञता म्हणून रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती माजी उप सभापती रवींद्र तिरलोटकर, सरचिटणीस रामकृष्ण जुवाटकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उत्तम बिर्जे, शक्ति केंद्रप्रमुख संदीप तावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मकरंद जोशी, शक्ती केंद्रप्रमुख अंकुश टूकरुल, श्री प्रकाश पुजारी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!