शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रेंनी एसपी अग्रवाल यांना दिले निवेदन
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून यातून समाजस्वास्थ्य बिघडत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तात्काळ करवाई करून अवैध धंदे बंद करा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कणकवली विधानसभा संघटक संदेश पटेल, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर आदी उपस्थित होते.निवेदनात आग्रे यांनी म्हटले आहे की सिंधुदुर्गात मटका जुगार दारू, जनावर तस्करी, वेश्या व्यवसाय आदी अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे.यातून दिवसेंदिवस गुन्हे चोऱ्या वादविवाद होत आहेत.यामुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष करत असल्याची निवेदने जनतेतून येत आहेत. यामुळे युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. तसेच अनेकांचे संसार मोडत आहेत.किरकोळ भांडणातून गंभीर गुन्हे होत आहेत.यावर कारवाई करत सर्व अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी श्री आग्रे यांनी केली आहे.













