अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये मेजर कौस्तुभ राणे यांना वाहिली श्रद्धांजली

अमर रहे अमर रहे मेजर कौस्तुभ राणे अमर रहे अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला

वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने मेजर कौस्तुभ राणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. सन 2018 साली जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांशी सामना करताना वैभववाडीचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले होते यामध्ये अनेकांना वीरमरण आले होते या सर्वांना प्रशालेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर हा कार्यक्रम संपन्न झाला.

      यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी एस पर्यवेक्षक पाटील पी एम जेष्ठ शिक्षक शिंदे एस बी,  पाटील एस एस ,सावंत पी जे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  अमर रहे अमर रहे मेजर कौस्तुभ राणे अमर रहे अशा घोषणा दिल्या.
error: Content is protected !!