गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती करावी

आम.नितेश राणेंनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी

केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री शिंदेशी केली चर्चा

कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरात येऊन ठेपला असताना कोकणात जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांनी दैनावस्था झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती करावी.गणेश चतुर्थीला कोकणात आपल्या गावी वाहनांनी जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी तात्काळ नॅशनल हायवे खड्डेदुरुस्ती आणि गणेशभक्त प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याबाबत योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.दरम्यान केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेत गणेशोत्सवाला जाणाऱ्या प्रवाशांना टोलमाफी मिळावी, रस्ते खड्डेमुक्त करावेत याबाबत चर्चा केली.

error: Content is protected !!