कणकवली (प्रतिनिधी) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत 14 ऑगस्ट रोजी सरपंच सुशिल कदम यांच्या संकल्पनेतून तरंदळे ग्रामपंचायत चे शिपाई शिवराम (शामु) गावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.गावासाठी तळमळीने 35 वर्ष सेवा केल्याचे चीज झाल्याची भावना गावकर यांची होती.
भारत देश 2047 मध्ये विकसित होवून देश महासत्ता बनण्यासाठी पंचप्रण शपंथ घेण्यात आली.आपल्या मातृ भूमी साठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले त्याग केला अशा शुर वीरांच्या स्मारकाचे शिला फलकाचे उदघाटन सरपंच सुशिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले.तरंदळे गावातील माजी सैनिक सोनू सावंत व माजी महाराष्ट्र पोलिस सुनिल सावंत यांचा शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प देवून सत्कार सरपंच सुशिल कदम व उपसरपंच शुभावली सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.दोघानाही ह्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.
ग्रामपंचायत कार्यालय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी,शालेय परिसरात 75 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आला.यावेळी सरपंच सुशिल कदम,उपसरपंच शुभावली सावंत,ग्रा पं सदस्य तेजस सावंत,दीपक घाडी गावकर,सूनिलदत्त जाधव,नेहा घाडी गावकर,वैशाली घाडी गावकर,संजना राणे,ग्रामसेवक रेश्मा पालकर,माजी सरपंच सुधीर सावंत,सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन सावंत,पत्रकार शरद सावंत,माजी सैनिक सोनू सावंत,माजी पोलीस सुनिल सावंत,सामाजिक कार्यकर्ते देवा रावले,मुख्याध्यापक साै.कुलकर्णी,पोकळे सर,डोईफोडे सर, तळदेवकर सर,अंगणवाडी सेविका,आशा ताई,बचत गट प्रतिनिधी, सिआरपी ताई,गावातील प्रतिष्ठित नागरिक,शाळेतील विद्यार्थी ग्रामपंचायत कर्मचारी अभय सावंत,शिवराम गावकर,वनिता कदम उपस्थित होते.
ग्रामसेवक रेश्मा पालकर यांनी सर्वजण उपस्थित राहिल्या बद्दल सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत केले व आभार ही मानले.गावातील माजी सैनिक सन्माननीय प्रभाकर सावंत यांचं सत्कार त्यांच्या राहत्या घरी जावून सरपंच सुशिल कदम,माजी सरपंच सुधीर सावंत,सामाजिक कार्यकर्ते देवा रावले,किरण सामंत,आणि अभय सावंत यांनी शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.













