भारतीय स्वातंत्र्य सोहळ्याचे चित्र साकारत साजरा केला आजादी का अमृतमहोत्सव सांगता सोहळा

वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

चौके (अमोल गोसावी) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सांगता सोहळा संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. हा सांगता उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे जवळपास ७६फूट लांबीचे भारतीय स्वातंत्र्य सोहळ्याचे चित्र बालकलाकारांनी साकारले . हे चित्र या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी फक्त दोन तासांमध्ये पूर्ण केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्र राज्यातील एवढ्या लांबीचे चित्र प्रथमच साकारलेले आहे. हे चित्र साकारण्यासाठी प्रशालेतील इयत्ता आठवी ते बारावी तसेच माजी विद्यार्थी व वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक व कलाशिक्षक समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी या उपक्रमा साठी शुभेच्छा दिल्या. वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!