भाजपची जनसेवा… प्रत्येक नागरिकापर्यंत!

सावंतवाडी शहरात भाजपकडून छत्री वाटप; बाजारपेठेत भाजपमय वातावरण

बांदा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सावंतवाडी शहरातील भाजपा उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, सावंतवाडी मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक यांच्यासह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी मनापासून स्वागत केले. शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर छत्री वाटप करण्यात आले. कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसर भाजपमय वातावरणाने भारावून गेला.

यावेळी सावंतवाडी शहरातील नगरसेवक सिद्धार्थ भांबूरे, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, दिलीप भालेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, निलम नाईक, सुनिता पेडणेकर, केतन आजगांवकर, सुदेश नेवगी, सुमित वाडकर, ॲड. संजू शिरोडकर, नागेश जगताप, धिरेंद्र म्हापसेकर, बंटी जामदार, संतोष तळवणेकर, अल्ताफ मुल्ला, कुणाल शुंगारे, मेघना साळगावकर, ज्योती मुदाळे, अवनी मेस्त्री तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!