भोमवाडीतील मानसिक रूग्ण महिला संविता आश्रमात दाखल

भोमवाडी ग्रामपंचायत मार्फत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी महिलेला आश्रमात केले दाखल

खारेपाटण (प्रतिनिधी): आजगाव भोमवाडी वरचावाडा ता.सावंतवाडी येथील मानसिक आजारी महिला श्रीम.फेल्सियान डायगो डिसोजा (वयः६३) यांना नुकतेच जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात सुरक्षा आणि उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भोमवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीम.अनुराधा वराडकर यांनी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांना निराधार मानसिक आजारी महिलेला संविता आश्रमात दाखल करून घेण्याची विनंती केली. तसेच त्यांनी पोलिसांना महिलेबाबत कळविल्यावरून वेंगुर्ला पोलिस स्टेशन अंतर्गत शिरोडा पोलिस स्टेशनचे पोलिसांनी त्यांना सुरक्षा आणि औषधोपचारासाठी संविता आश्रमात दाखल केले. कुडाळ येथील मानसोपचार तज्ञ डाँ.धुरी यांचेकडे महिलेवर औषधोपचार सुरू करण्यात आले असून सध्या महिलेची मानसिक स्थीती स्थीर असून त्या शांत झाल्या आहेत. श्रीम.फेल्सियान डिसोजा या त्यांच्या मानसिक आजारी अवस्थेत त्यांचे शेजारी, ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांना त्रासदायक ठरत होत्या. फेल्सियान या मानसिक आजारी अवस्थेत व्हाँयलंट होत असल्याने कुटुंबियांना ही त्यांची देखभाल करणे शक्य होत नव्हते असे सांगण्यात आले. आश्रमात दाखल करण्याआधी त्यांनी ग्रामपंचायतच्या दोन कर्मचा-यांनाही मारहाण केल्याचे भोमवाडी सरपंच श्रीम.अनुराधा वराडकर यांनी म्हटले. फेल्सियान यांना संविता आश्रमात दाखल करण्यात शिरोडा पोलिस चौकीचे बिट हवालदार श्री.गजेंद्र भिसे आणि बिट हवालदार योगेश राऊळ यांचेसह संविता आश्रमचे जनसंपर्क अधिकारी महाबळेश्वर (उदय) कामत ,लिना पालकर ,जानकी आंगणे यांची प्रमुख भुमिका राहिली.आश्रमातील सर्व सेवा कार्यकर्ते फेल्सियान यांची आश्रमात सर्वोत्तोपरी काळजी घेत आहेत.

error: Content is protected !!