साद फाउंडेशन चा वर्धापन दिन नाग्या महादू वसतिगृहात सामाजिक जाणिवा जपत साजरा

कणकवली (प्रतिनिधी): १ ऑगस्ट २०२२ रोजी गतवर्षी स्थापन झालेल्या साद फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेचा वर्धापन दिन आणि साद च्या अध्यक्षा गितांजली नाईक यांचा जन्मदिन हा १ ऑगस्ट असतो हा दिवस नुकताच तेरसे बांबर्डे येथील नाग्या महादू वसतिगृहातील मुलांच्या बरोबर साजरा करण्यात आला. यावेळी वसतिगृहातील संयोजक अहिर , साद अध्यक्षा गितांजली नाईक,सचिव सचिन कोर्लेकर, कुडाळ नगरपंचायत अभियंता विशाल होडावडेकर, प्रवीण कोरगावकर बँक ऑफ महाराष्ट्राचे ऑफिसर गौरेश होडावडेकर,प्रवीण कोरगावकर उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी व साद फाउंडेशन च्या अध्यक्षा गितांजली नाईक यांच्या वाढदिवसाचे आणि साद च्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून साद फाउंडेशन तर्फे नाग्या महादू कातकरी वसतिगृह येथील मुलांसाठी अभियंता विशाल होडावडेकर,प्रवीण कोरगावकर,बँक मॅनेजर तातू राणे, आरोग्य अधिकारी प्रसन्ना कुमार वाघरे,अस्मिता उपडे, भाऊ गौरेश नाईक या दानशूर मान्यवरांच्या देणगीतून जमलेल्या ११,०००रू मधून ६१ मुलांसाठी नवीन कपडे घेण्यात आले..यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर चा आनंद अविस्मरणीय आणि शब्दात न सांगण्यासारखा होता.यावेळी वसतिगृह ला त्यांच्या गरजेनुसार हांडा- कळशी,केस कट करायची मशीन देण्यात आली.गौरेश होडावडेकर यांनी तांदूळ, डाळ , कांदे बटाटे दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून देण्यात आले..तसेच जुन्या कपड्यांसाठी आवाहन करण्यात आलेले होते,त्याप्रमाणे कणकवली नगरपंचायत, आनंद जाधव, आरती कांबळी, संदीप परूळेकर,स्वप्नाली सावंत, प्रमोद साटम या मान्यवरांच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले जुने कपडे देण्यात आले.तसेच गितांजली नाईक यांनी आपल्या वाढदिवस या मुलांसोबत केक कापून साजरा केला. या वसतिगृहाचे संचालक उदय अहिर यांचा भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. नाग्या महादू वसतिगृहात फिनेल, अंघोळीचा, कपड्याचा,भांडी धुण्याचा साबण साद फाउंडेशन च्या मार्फत प्रवीण कोरगावकर यांनी वसतिगृहाचे संचालक अहिर यांना सुपूर्द केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साद फाउंडेशन चे सचिव सचिन कोर्लेकर आणि वर्षा तळेकर यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले. तसेच यावेळी मुलांना त्यांच्या भावी आयुष्या विषयी मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.

error: Content is protected !!