माजी सभापती राजेंद्र परब यांना मातृशोक

चौके ( प्रतिनिधी ) : मालवण पंचायत समितीचे माजी सभापती तथा काळसे हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र परब यांच्या मातोश्री श्रीमती सत्यवती लवू परब ( वय ९७ ) यांचे काल मंगळवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी रात्रौ काळसे माळकेवाडी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे , सुना , दोन मुली , जावई , नातवंडे असा परीवार आहे. काळसे गावातील उपक्रमशील शेतकरी उत्तम परब यांच्याही त्या मातोश्री होत्या.

error: Content is protected !!