इन्सुली येथे घडला अपघात ; युवक गंभीर जखमी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : भरधाव वेगात जाताना दुचाकीवरील ताबा सुटून गाडी डिव्हायडरवर आदळल्यामुळे युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली येथे घडला. सौरभ मधुकर कदम (२४), असे त्याचे नाव आहे. दरम्यान अपघातानंतर त्याला प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवक आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन सावंतवाडीच्या दिशेने येत होता. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली येथे त्याचा दुचाकी वरील ताबा सुटल्यामुळे गाडी डिव्हायडर र धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, या अपघातात संबंधित युवकाच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान घटनास्थळावरील नागरिकांनी मदत कार्य करत त्याला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णाला दाखल केले.