संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत फेन्सिंग व ईपी या प्रकारात अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी चा विद्यार्थी कु.साईराज विनायक वावरे. याने १७ वर्षे वयोगटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व संचालक शरद नारकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले व पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, मुख्याध्यापक नादकर बी.एस., पर्यवेक्षक पाटील पी.एम.,क्रीडा शिक्षक तुळसणकर एस टी व इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.











