24 तासांच्या आत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

देवगड पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कारवाई

देवगड (प्रतिनिधी) : मिठबाव येथील विजवीतरण च्या तारांची चोरी करणाऱ्या 5 आरोपींच्या मुसक्या 24 तासाच्या आत आवळून त्यांना गजाआड करण्याची कौतुकास्पद कामगिरी देवगड पोलिसांनी केली आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, पोलीस हवालदार अमित हळदणकर , पोलीस शिपाई निलेश पाटील, विशाल वैजल, स्वप्निल ठोंबरे यांनी गुन्ह्याचा कसून तपास करून 24 तासाच्या देवगड शहर व परिसरातील गावातील चारही आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यासोबत चोरीस गेलेला मुद्देमाल ही जप्त केला आहे. .सागर भिकाजी शिंगाडे, वय 26, राहणार वरेरी,बिपिन सुरेश चव्हाण, वय 37, राहणार कुणकेश्वर, शाहरुख आयुब खान, वय 25, राहणार मळई जामसंडे, जुनैद कय्यूम होलसेकर,वय 19, राहणार देवगड किल्ला, मोहनलाल सुरजबली निसाद, वय 37,राहणार, सातपायरी, देवगड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 28 ऑगस्ट रोजी हा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या 24 तासांत चोरीचा छडा लावून चोरट्यांसह मुद्देमाल जप्त केल्याबद्दल देवगड पोलिसांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!