संबंधित प्रशासनाने तात्काळ दिव्यांगांची पेंशन जमा करावी ; अन्यथा २६ जानेवारी ला अधिकाऱ्यांना जाब विचारणार
लोकप्रतिनिधींनी देखील दिव्यांगांच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे.!
कणकवली (प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १००० रु. पेंशन मिळते. मात्र ही पेंशन योजना तुटपुंजी असली तरी दिव्यांग व्यक्तींना आधारभूत आहे. मात्र ही पेन्शन दिव्यांग व्यक्तींना कधी कधी दोन – तीन महिने मिळत नाही. त्यामुळे त्या दिव्यांग व्यक्तीची आर्थिम घडी बसते.
अलीकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता हा जानेवारी महिना अर्धा संपला तरी देखील अद्यापही दिव्यांग व्यक्तींच्या खात्यावर पेन्शन जमा झालेली नाही. जर अशी तुटपुंजी पेन्शन सुद्धा जर प्रशासन, शासन वेळेत देण्यास हतबल असेल तर संबंधीत अधिकाऱ्यांना २६ जानेवारी रोजी धारेवर धरून जाब विचारणार असल्याच्या प्रतिक्रिया दिव्यांग व्यक्तींकडून जोर धरू लागल्या आहेत.