कुंभवडे व नाधवडे गावात भाजपाचा उबाठाला धक्का वैभववाडी

वैभववाडी (प्रतिनिधी) : कुंभवडे व नाधवडे येथील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये कुंभवडे येथील स्वप्निल रामदास चव्हाण, श्रीधर राजाराम राऊत, विजय भिकाजी भुतारणे, प्रकाश जयराम चव्हाण, रघुनाथ रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. कुंभवडे गावचे भाजपा बुथ अध्यक्ष दीपक परशुराम सावंत व प्रमोद शांताराम सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. तसेच नाधवडे येथील प्रमोद आत्माराम पांचाळ यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वैभववाडीत भाजपा कार्यालयासमोर प्रचार सभा पार पडली. यावेळी नितेश राणे यांनी या सभेला मार्गदर्शन केले. यावेळी हा पक्षप्रवेश पार पडला. या प्रसंगी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!