जालनातील घटनेत दगड कोणी आणि कोणाच्या आदेशावरून मारला ?
छत्रपती संभाजीनगर मधील बस जाळपोळ घटनेत आंबदास दानवें च्या निकटवर्तीयाचा हात
दंगल घडविण्यामागे उद्धव राऊत यांची फूस असल्याचा संशय
आ.नितेश राणेंनी विरोधकांचा घेतला समाचार
कणकवली (प्रतिनिधी) : जालना मध्ये काल मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचे समर्थन कोणीच करू शकत नाही. हा लाठीचार्ज मस्ती करून अधिकाऱ्यांनी केला असेल तर त्यांच्यावर आमचे सरकार कारवाई करणार.फडणवीस यांनी याची उच्चस्तरीय चौकशी लावली आहे. शिवबा संघटनेचे पाटील मराठा आरक्षण साठी सतत प्रयत्न करत आहेत. पाटील यांच्यावर मागे झालेल्या केस वेळी माजी खा निलेश राणेनी त्यांना सहकार्य केले आहे. मराठा समाजाचे आजवर 58 मोर्चे शांतपणे निघाले आहेत. मग जेव्हा जालनातील या मोर्चावेळी पोलिसांवर दगडफेक मराठा समाजातील तरुणांनी केली असेल असे मला वाटत नाही.मराठा समाजाला बदनाम कोणाला करायचे आहे ? मराठा आरक्षण राणे समितीने दिले आणि त्याला देवेंद्र फडणवीस यांनी ते टिकवले.कालपासून फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना ठाकरे सरकारने कोर्टात चांगला वकील न देता मराठा आरक्षण ची वाट लावली.मराठा समाजाच्या माता भगिनींना मुका मोर्चा म्हणून सामना मधून डिवचले होते. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी मंत्री असताना मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून दिले.वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावर बोलूच नये. छत्रपती संभाजी नगर मध्ये झालेल्या बसजाळपोळ मागे कोण आहेत ? यविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय रघुनाथ शिंदे याचे नाव यात पूढे येत आहे. उबाठा सेनेचे नेतेच या दंगली घडवत असल्याचा संशय यात आहे.हिंदुंच्या जाती जातीत वाद लावून जिहादी ना पोसायचे विरोधकांचे धंदे आहेत.मराठा आरक्षण हा यांचा मुद्दा नसून हिंदुंचे जनआक्रोश मोर्चे ही विरोधकांची पोटदुखी आहे. निर्दोष मराठा समाज आंदोलकांवर गुन्हे दाखल होऊ नयेत ही माझी मागणी आहे. मी स्वतः जालन्यात जाणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत जे दंगल होणार असे म्हणत होते ती हीच काय ? याची चौकशी झाली पाहिजे. छत्रपती संभाजी राजेंनी जालन्यात पहिला दगड कोणी मारला ? याची माहिती घ्यावी. मराठा समाजाला माझे आवाहन आहे की फडणवीस सरकारनेच आपल्याला आरक्षण मिळवून दिले होते. राज्यातील युती सरकार हे मराठा समजाविरोधात नाही. आपण सर्वांनी शांततेने सहकार्य करावे.












