आचरा (प्रतिनिधी) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education) कडून मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेत चिंदर अपराजवाडी च्या रिद्धी संपदा संतोष अपराज हिने घवघवीत यश संपादन केले आहे. नवोदय विद्यालय सांगेली, सावंतवाडी येथे शिकत असलेल्या रिद्धी हिने ७८.१७% गुण प्राप्त करत आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल तीचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
सी बी एस ई बोर्ड बारावी परीक्षेत रिद्धी अपराज चे यश….!










