खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटणसह पंचक्रोशीमध्ये शनिवारी झालेल्या चक्रीवादळात संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे.या सर्व गोष्टीची परिस्थिती पूर्वपदावर आणण्या साठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन,तालुका व जिल्हा प्रशासन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे साहेब यांच्या सतत संपर्कात राहून शर्थीचे प्रयत्न वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू आहेत.व ही परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे येथील परिस्थितीचा आढावा घेत असून वीज वितरण चे सर्व अधिकारी कर्मचारी,सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य नुकसान झालेल्या भागाला भेट देऊन नागरिकांना दिलासा देत आहेत.तर पालक मंत्र्यांच्या आदेशाने वीज वितरण चे सर्व कर्मचारी गेली पाच दिवस रात्री उशिरा पर्यंत साईटवर काम करत होते.आज बुधवारी पाच दिवसानंतर सायंकाळी उशिरा खारेपाटण मधील सर्व विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाला.
परंतु या कठीण प्रसंगी सर्व ग्रामस्थानी एकजुटीने प्रयत्न करणे अपेक्षित असताना खारेपाटण गावातील दुसऱ्या पक्षाचे स्वयंघोषित पुढारी जे पालकमंत्र्यांच्या तुकड्यावर जागतात व त्यांच्याच विरोधात काम करत असतात असे काही जण महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना स्वतःच्या घराचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी दमदाटी करून कामत अडचणी निर्माण करत होते.व जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांचे लक्ष नाही अशी बोंब करत होते.परंतु या संपूर्ण परिस्थीतीत स्वत पालकमंत्री नितेश राणे कॉन्फरन्स कॉल द्वारे सर्व अधिकारी व आमच्या कार्यकर्त्यां च्या संपर्कात होते.व संपूर्ण परिस्थिती चा आढावा घेत होते. व त्यांच्या सूचनेनुसार आमचे सर्व कार्यकर्ते गेली पाच दिवस वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत करत होते.
परंतु मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाणारा व स्वपक्षातील कार्यकर्ते सोबत नसताना देखील स्वतःला स्वयंघोषित पुढारी तो कार्यकर्ता पालकमंत्र्यांचे नाव वापरून खारेपाटण मधील चक्रीवादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्व पदावर येऊ नये व पालक मंत्र्याचे दुर्लक्ष या मथळ्याखाली बदनामी करण्याच्या प्रयत्नात होते.तरी पालकमंत्राचे नाव घेऊन जनतेच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्या अशा लोकांना जनताच योग्य वेळी धडा शिकवेल.तरी कोणीही उपटसुंब्याने येथील नियोजनावर आक्षेप घेण्याचे बेताल बोलण्याचे धाडस कोणी करू नये.अशी खरमरीत टीका वजा इशारा भाजप पक्षाच्या महिला कार्यकर्त्या तथा खारेपाटण मतदार संघाच्या जि.प.सदस्या प्राची ईसवलकर यांनी खारेपाटण मधील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियोजनावर भाष्य करणाऱ्या तथाकथित विरोधी पक्षाच्या पुढाऱ्याला दिला.










