आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन बांदा येथे उत्साहात साजरा

बांदा (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ बांदा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आधुनिक नर्सिंगच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

१९६५ पासून ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेस’तर्फे जगभरात हा दिवस साजरा केला जातो. त्यांचा जन्मदिवस हा जगभरातील परिचारिकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत मानला जातो. या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रुग्णसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन, हर्षदा घाडी, अर्चना गोन्सालविस, मृणाली कदम, रूपाली नार्वेकर, मिझबा शेख,रुही चौगुले, सीमा ठाकूर, सुप्रिया रंगसुरे, विशाखा निगुडकरह यांच्यासह इतर कर्मचारी वृंद उपस्थित होत्या.

error: Content is protected !!