आंबेरी केंद्रस्तरीय तृणधान्य पाककलाकृती स्पर्धा संपन्न

केंद्रातील ११ शाळांच्या स्पर्धक महिलांचा सहभाग

हर्षदा गुराम यांनी पटकावला प्रथम क्रमांक, तर अक्षता गोसावी व सायली नार्वेकर ठरल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी

चौके (अमोल गोसावी ) : शनिवार दिनांक २ स्प्टेंबर रोजी आंबेरी केंद्र स्तरीय पाक कलाकृती स्पर्धा आंबेरी केंद्र प्रमुख नंदकिशोर गोसावी यांच्या नियोजनाखाली प्राथमिक शाळा काळसे धामापूर येथे संपन्न झाली. दरम्यान सकाळी या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले यावेळी व्यसपिठावर आंबेरी केंद्र मुख्याध्यापक धानजी चव्हाण सर, व विषय तज्ञा नार्वेकर मॅडम, परीक्षक पाडगावकर मॅडम व दीक्षित मॅडम, काळसे धामापूर शाळा मुख्याध्यापक सुकन्या गंगावणे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वप्नाली गोसावी तसेच सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक उपस्थित होते.

त्यानंतर स्पर्धा परीक्षक सौं पडगावकर व दीक्षित यांनी 11 स्टॉलची पाहणी करून अचूक परीक्षण केले. यामध्ये स्पर्धक पालक महिलांनी ज्वारीची इडली, नाचणी वडी, नाचणी केक, मिक्स धान्य नानकटाई, नाचणी संतू, नाचणी गूळ पापडी, मिक्स मेदू वडी, तांदळाच्या शेवया, नाचणी बर्फी, मिक्स थाळीपिट असे नावीन्यपूर्ण पदार्थ बनविले होते. एकूण 50 गुणांचे मूल्यांकन करून 1 ते 3 क्रमांक काढण्यात आले यात प्रथम हर्षदा हेमंत गुराम, द्वितीय अक्षता आंनद गोसावी, तर तृतीय सायली नार्वेकर असे क्रमांक काढण्यात आले. यामध्ये क्रमांक प्राप्त स्पर्धेकांना केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी, व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात आली. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली. यासाठी आंबेरी केंद्रातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार धामापूर बौध्दवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक दिपक गोसावी यांनी मानले

error: Content is protected !!