संजय कसा आहेस ….हॅप्पी बर्थडे !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संजय आग्रेंना शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : हॅलो संजय कसा आहेस ?…हॅप्पी बर्थडे… तुझ्या भावी राजकीय वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत….अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी 11 वाजता खास मोबाईल कॉल केला. मुख्यमंत्री शिंदेंसोबत आग्रे यांचे जवळकीचे संबंध असून मुख्यमंत्री शिंदे यांनी भावी राजकीय वाटचालीस दिलेल्या शुभेच्छा आणि त्याच वेळी भावी आमदार असा उल्लेख असलेला आग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेला शुभेच्छा बॅनर याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.

error: Content is protected !!