आमच्या संजयला दीर्घायुरारोग्य लाभो

वर्गमित्रांनी वाढदिनी गांगोमंदिरात केला दुग्धाभिषेक

फोंडाघाट(प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस यश मिळो यासाठी फोंडाघाट हायस्कूल मधील आग्रे यांच्या दहावीतील वर्गमित्रांनी फोंडाघाट ग्रामदैवत गांगो मंदिरात दुग्धाभिषेक केला. फोंडाघाट हायस्कूल च्या 1990-91 च्या एस एस सी बॅच च्या वर्गमित्रांनी दुग्धाभिषेक केला. यावेळी राजेश शिरोडकर, दीपक सावंत, हेमंत काळगे, भाऊ कानडे, राजेंद्र मर्ये, महेश पेडणेकर, महेश वालावलकर,धनंजय हळदीवे, अभिनंदन डोर्ले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!