खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या सौजन्याने खारेपाटण येथे 2 सिमेंट बेंच प्रदान करण्यात आले.खारेपाटण रामेश्वरनगर येथे रामेश्वर महिला मंडळ यांच्या करिता ही बैठक व्यवस्था करण्यात आली. रामेश्वरनगर येथील जेष्ठ महिला शुभांगी गुरव , ग्रा पं सदस्य गुरू शिंदे यांच्या हस्ते या बैठक व्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, आरती वरुणकर, ब्रह्मदंडे, तृप्ती पाटील, श्रीमती कावले, भिकाजी धुमाळ, मंदार मण्यार, अमोल कांबळे, शेखर कांबळे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.










