जिल्हा परिषद शाळा किंजवडे खालचीवाडी येथे वैविध्यपूर्ण पाककृतीतून,तृणधान्य जागृती कार्यक्रम संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : सन 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून तृणधान्यांचे आहारातील महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी अनेकविध उपक्रम राबवले जात आहेत. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना आणि राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत तृणधान्य निर्मित पाककृती स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे खालचीवाडी येथे आयोजीत करण्यात आली होती. यासाठी महिला वर्गानी तांदूळ, नाचणी, वरी अशी तृणधान्य वापरून अनेक पाककृती बनवल्या होत्या.

यावेळी किंजवडे ग्रामपंचायत सदस्य किरण टेबूलकर यांनी फास्ट फूडच्या काळात तृणधान्यापासून बनवलेले पदार्थ आपल्या निरोगी आरोग्यासाठी किती फायद्याचे आहेत हे समजावून सांगितले. जान्हवी लोके यांनी मालवणी कवितेतून तृणधान्य महती सर्वांना समजून दिली. आशा सेविका नरिंग्रेकर यांनी देखील तृणधान्य महत्तव सर्वांना सांगितले. या कार्यक्रमासाठी किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर, ग्रा.पं. सदस्य टेबूलकर,ग्रामसेवक शिवराज राठोड, प्राथमिक शिक्षिका जान्हवी लोके,सर्व अंगणवाडी सेविका – मदतनीस, आशा सेविका आणि पालक -ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!