जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा वैभववाडीत संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व मा.वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे व त्या आधारावर उच्च पदावर मजल मारावी आपल्या वैभववाडी तालुक्याचे नाव रोशन करावे असे मत उद्धघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रिडा शिक्षक एस.टी. तुळसणकर यांनी केले. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे , वैभववाडीचे नायब तहसीलदार पाटील साहेब , मुख्याध्यापक बी.एस.नादकर, तालुका क्रीडा समन्वयक घावरे सर, फाळके सर ,वैभववाडी विषय शिक्षक गटसाधन केंद्राचे तापेकर सर, पंढरे सर तसेच तालुक्यातील क्रीडा शिक्षक ,संघ व्यवस्थापक, पंच ,पालक व खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते .













