दोडामार्ग (प्रतिनिधी): दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, बाबरवाडी गावची स्नुषा आणि हरकूळ, कणकवली येथील कन्या – सौ मृदुला ( अर्चना) मनोज कुंभार . ह्यांच्या आईचे काल ३ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने कुडाळ येथे निधन झाले . निधनानंतर तीचे सर्व विधी तीच्या गावी हरकूळ येथे करण्याचे ठरविले परंतु तेथिल प्रतिकूल परिस्थिती आणि तेथे कुणाचाही तिला पाठीबा नसल्याने तिने अत्यविधी त्यांच्या कामानिमित रहात्या गावी म्हणजेच कुडाळ येथे करण्याचे ठरविले. सर्व सोपस्कार ते राहत असलेल्या अपार्टमेंट मधील लोकांनी केले परंतु प्रश्न उभा राहिला तो प्रेताला अग्नि कोण देणार ? काही आप्तस्वकियाकडून नकाराच्या माना फिरल्या तेव्हा ज्या ठिकाणी एका मुलीच्या डोळ्यात फक्त अश्रु दिसतात त्यावेळी मृदुलाने कठोर मनाने आईने दिलेल्या संस्कारची जपणूक करत तीच्या उपकाराची परतफेड करत स्वतः आईच्या चितेला कुडाळ येथे स्मशान भूमीत अग्नि दिला .
धन्य ती जन्मदात्रि आणि धन्य ती कन्या
आजही समाजात भाऊ नाही म्हणून मुलीना हिणवल जात . भाऊ नाही ती मुलगी सून म्हणून नाकारली जाते . तिला समाजात अव्हेरल् जात . त्याच समाजाला परंपरेने जखडलेल्या समाजाला एका मुलाच कर्तव्य पार पाडून दाखवत आजच्या नव्या पिढीला जणू तीने आव्हानच देत मुलीनेच दिला आईच्या चितेला अग्नी मृदुला (अर्चना) हिनेच मागील 18 वर्षे आईचा संभाळ केला. अन्य दोन बहिणी वेगवेगळ्या गावी स्थायिक आहेत. मृदुला कुटुंब व्यवसायानिमित्त कुडाळ येथे स्थायिक झाले आहे. मागील काही वर्षांपासून आईच्या आजारपणात अर्चना व तिच्या कुटुंबानेच शुश्रुषा शुश्रुषा केली. मागील काही दिवसांपासून आई अंथरुणाला खिळली असताना अर्चनाने आपल्या चुलत भावांशी संपर्क साधला. आईच्या मृत्यूनंतर कणकवली, हळकुळ येथे तिच्या मूळ गावी दहन करावे अशी तिने इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मृदुला(अर्चना) हिच्या कुटुंबाने मृत्यूनंतर कुडाळ येथेच दहन करण्याचा निर्णय घेतला. हिंदू समाजामध्ये आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला चितेला अग्नी देण्याचा अधिकार असतो. पण अर्चनाला भाऊच नसल्याने हा प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे अर्चना हिने स्वतः आईला अग्नी देण्याचा निर्णय घेतला. कायम मितभाषी असणारी मृदुला(अर्चना) हिने हा निर्णय घेतल्याने निश्चितच कुटुंबातील व्यक्तींना आश्चर्य वाटले. पण नवरा मनोज रघुनाथ कुंभार व सासरे रघुनाथ व्यंकटेश कुंभार यांनी तिला धीर देत तुला जसा निर्णय घेता येईल तसा घे. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे सुचविले. त्याप्रमाणे तिने सारासार विचार करून सामाजिक बंधनांना बाजूला सारून निर्णय घेतला व आईच्या चितेला अग्नी दिला. कोणत्याही आई-वडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी ही समसमान असतात. दोघांनाही सारखेच हक्क प्राप्त व्हायला हवेत असं आपण फक्त बोलण्यातून ऐकतो. पण सुरुवात कोणी करायची हा प्रश्न असतो. या सर्वाला मृदुला (अर्चना) मनोज कुंभार हिने फाटा देत प्रस्थापित व्यवस्थेला बाजूला ठेवून मुलगा मुलगी समसमान आहेत हे ब्रीद कृतीसहित सिद्ध केले. ज्या आई-वडिलांना मुलगा नाही अशा कुटुंबातील पुरुष मंडळी मृत व्यक्तींच्या चितेला अग्नी देतात. अर्चनाने खूप मोठ्या धाडसाने हा निर्णय घेतला. कणकवली तालुक्यातील हरकुल येथे आईच्या प्रेमात व संस्कारात वाढलेली मृदुला (अर्चना) मनातून खूप सक्षम बनली होती. आईने दिलेले संस्कार जपत दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, बाबरवाडी सारख्या एका खेडेगावातल्या समाजाला एक नवीन धडा दिला आहे. मुलींनी स्मशानात जाऊ नये हा अधोरेखित समाज समज तिने खोडून काढला.आजही आपल्या समाजामध्ये एखाद्या बहिणीला भाऊ नसेल तर हीनवलं जात. मृदुलाने मुलाचं कर्तव्य करून समाजाला एक वेगळा पायंडा घालून दिलेला आहे.रुढी पंरपरे ने जखडलेल्या समाजाला मागे सारत मृदुलानेच दिला आईच्या चीतेला अग्नी . स्वार्थ आणि अहंकारापोटीआपल्याच रक्ताच्या माणसांना संपवायला निघालेल्या या काळात मृदुला (अर्चना) ची कृती नक्कीच समाज बदलाची नांदी ठरेल. तिच्या या धाडसाला आणि विचार परिवर्तनाला तिच्या कर्तृत्वाला सलाम !
रुढी पंरपरे ने जखडलेल्या समाजाला मागे सारत मृदुलानेच दिला आईच्या चितेला अग्नी












