देवगड(प्रतिनिधी) : जालना येथील मराठा समाज आंदोलनावर झालेले लाटी आल्याच्या जाहीर निषेध व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे याबाबत देवगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देवगड एसटी स्टँड ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही देण्यात आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना येथे मराठा बांधवांकडून सनदशीर मार्गाने व शांततेने उपोषण बसलेल्या मराठा बांधव भगिनी मुलांवर अमानुषपणे पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला. या घटनेत अनेक जण जखमी झाले सदर घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज व शांतता प्रेमी बांधव करत आहेत. सदर घटनेच्या देवगड तालुका मराठा समाज यांच्या वतीने देखील आम्ही जाहीर निषेध करत सदर घटनेत हल्ल्याचा आदेश देणारे पोलीस अधिकारी प्रत्यक्ष कार्यवाही करणारे पोलीस अधिकारी व संबंधित शासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने आम्ही निवेदनाद्वारे करत आहोत असे आशयाचे निवेदन देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने देवगड नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांच्याकडे देण्यात आले. यावेळी देवगड तालुका सकल मराठा समाज अध्यक्ष संदीप साटम, उपाध्यक्ष अजित राणे, सचिव केदार सावंत, सहसचिव किसन सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य अनघा राणे,प्रवीण वातकर ,दयानंद पाटील, किरण टेंबुलकर, पंकज दुखंडे, मिलिंद माने,उमेश कणेरकर, बंटी कदम, अमित साटम, निशिकांत साटम, संजय लाड, तुषार पाळेकर,आदींसह असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.
जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेधार्थ देवगड मराठा समाज बांधवांनी दिले तहसीलदार निवेदन












