विज समस्या पूर्ततेसाठी शिवसेना-युवासेना कलमठ ची वीज वितरण ला धडक

कणकवली (प्रतिनिधी): गणपती आणि गोपाळकाला आणि त्या नंतर सुरू होणारे सण यांच्या अनुषंगाने विजेचे होणारा नेहमीचा तूटवडा थांबवण्यात यावा यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे सुचविले असता लवकरच कलमठ गावासाठी येणाऱ्या विजेचा सर्व समस्या दूर होतील असे आश्वासन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिले. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांचा शिफारशीनुसार मंजुर झालेल्या ट्रान्सफॉर्मर लवकरच कलमठ बिडयेवाडी मध्ये चालू करू असेही आश्वासन दिले. यावेळी सुशांत नाईक(युवासेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग) अनुप वारंग (कलमठ विभाग प्रमुख) धिरज मेस्त्री (कलमठ युवासेना शहरप्रमुख) सचिन खोचरे(ग्रामपंचायत सदस्य) नितेश भोगले(कणकवली तालुका संघटक) निसार शेख(माजी सरपंच) विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!