जिल्हाप्रमुख आंग्रेंच्या उपस्थितीत महिला कार्यकर्त्या नंदिनी पराडकर यांचा पक्षप्रवेश
खारेपाटण (प्रतिनिधी): उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या खारेपाटण येथील सक्रिय महिला कार्यकर्त्या नंदिनी पराडकर यांनी जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव व खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या नेतृत्वाखाली आपण शिंदे गटात प्रवेश केल्याचे नंदिनी पराडकर यांनी सांगितले.यामुळे खारेपाटण येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला एकप्रकारे धक्का मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांचे वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधून नंदिनी पराडकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी उपजिल्हा प्रमुख हरेश पाटील,महीला जिल्हा प्रमुख श्रीम वर्षा कुडाळकर, कणकवली विधानसभा संघटक संदेश पटेल, जिल्हा सचिव – किसन मांजरेकर, खजिनदार – भास्कर राणे, तालुका प्रमुख – भूषण परुळेकर तसेच खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश ब्रम्हदंडे,खारेपाटण ग्रा.प.सदस्य – गुरूप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. नंदिनी पराडकर या खारेपाटण ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढविलेल्या महिला उमेदवार होत्या.आज त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे पक्षाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.लवकरच पक्षाच्या वतीने त्यांचेकडे मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.












