पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आदेश
संदेश पारकर , संजय पडते यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
सतीश सावंत कणकवली विधानसभाप्रमुख तर अतुल रावराणे कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी नियुक्ती चे भिजत असलेले घोंगडे अखेर दूर गेले असून संदेश पारकर यांची कणकवली देवगड वैभववाडी आणि मालवण या 4 तालुक्याच्या जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.संजय पडते यांची कुडाळ वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग या 4 तालुक्यांसाठी जिल्हाप्रमुख म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे. तर सतीश सावंत यांची कणकवली विधानसभा प्रमुख आणि अतुल रावराणे यांची कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यात पदाधिकारी नियुक्ती चा प्रश्न सुटला असून या नियुक्त्यांआधी मातोश्री वर झालेल्या चर्चेत कणकवली मतदारसंघातून उबाठा शिवसेनेचा एक आमदार निवडून द्या मी तुम्हाला दुसरा आमदार देतो असा आदेश वजा खुली ऑफर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक आमदार वैभव नाईक यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे भविष्यात विधानपरिषदेवर स्थानिक आणि या मतदारसंघात स्थायिक असलेल्या उमेदवाराला संधी मिळेल अशी शक्यता आहे.