प्रमोद जठार,संदेश पारकर व संजय आंग्रे यांनी दिली दहीकाला उत्सवाला सदिच्छा भेट
खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण येथील प्रसिद्ध असलेला सार्वजनिक दहीकाला उत्सव यंदा प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी उस्ताही व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.खारेपाटण एस टी बस स्थानक सह संपूर्ण बाजारपेठेत बांधण्यात आलेल्या विविध मंडळांच्या दही हंड्या व आकर्षक चित्ररथ तसेच दशक्रोशितून आलेले गोविंदा पथक आणि नागरिकांनी व राजकीय पुढाऱ्यांनी खारेपाटण परिसर गर्दीने गजबजून गेला होता.
खारेपाटण येथील सार्वजनिक दहीकाला उत्सवासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार प्रमोद जठार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाअध्यक्ष संदेश पारकर,शिवसेना पक्ष शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय आंग्रे, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव,महेश कोळसुलकर,राजापूर येथील शिंदे गटाचे कार्यकर्ते अशपाक हाजु,संदेश पटेल,एकनाथ कोकाटे उद्योजक सतीश गुरव, मधुकरशेठ गुरव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे खारेपाटण सार्वजनिक दहीकाला उस्तव कमिटीचे कार्यवाह प्रवीण लोकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
खारेपाटण एस टी बस स्थानक दरवाजा नाका येथे सार्वजनिक दहीकाला उस्तव कमिटीच्या वतीने बांधण्यात आलेली दहीहंडी राजापूर खडपेवाडी,डोंबिवली महिला गोविंदा पथक यांनी पाच मानवी थर रचत फोडली. या गोविंदा पथकाला माजी आमदार प्रमोद जठार यांच्या शूभहस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
खारेपाटण मध्ये सकाळपासून दहीकाला उत्सवाला सुरवात झाली.गोविंदा गोपाळाचा गजर सर्वत्र ऐकु येत होता.खारेपाटण शहरात ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या वाडीवार स्थानिक मंडळाच्या दहीहंड्या गोविंदा खेळून फोडण्यात आल्या.तर दुपारी खारेपाटण बंदरवाडी येथील आदिनाथ मंडळाचा दहीकाला चित्ररथासह खारेपाटण बाजापेठेतून वाजत गाजत एस टी बस स्थानक येथे दाखल झाला.तर दुपारनंतर खारेपाटण खारेपाटण येथील सार्वजनिक दहीकाला उत्सवाला सुरवात करण्यात आली.
श्री देव रवळनाथ मंदिर येथून चित्र रथा व ग्रामस्थानसह दहीकाला खारेपाटण बसस्थान येथे दाखल झाला.यंदाच्या उस्तवात कुडाळ येथील भैरव जोगेश्वरी मित्र मंडळाचा “हनुमान संजीवनी पर्वत” हा चलचित्र देखावा आणण्यात आला होता.हा आकर्षक देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.खारेपाटण बसस्थानक येथे आलेली दहीकाला दिंडी खारेपाटण बाजारपेठेत चित्ररथासह वाजत गाजत घोडेपाथर बंदर पर्यंत नेण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार प्रमोद जठार,संदेश पारकर,संजय आंग्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करत खारेपाटण येथील दहीकाला उत्सवाला शुभेच्छा दिल्या.तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव संकेत शेट्ये,भाऊ राणे,सुधीर कुबल,शिवाजी राऊत,तेजस राऊत, संकेत लोकरे,गुरूप्रसाद शिंदे,विठ्ठल गुरव,किरण कर्ले,जयदीप देसाई, भूषण कोळसुलकर आदीनी सहकार्य केले.












