सावंतवाडी अर्बन बँकेकडून खातेदारांना रक्कम देण्यास सुरुवात
फोंडाघाट(प्रतिनिधी) : सावंतवाडी अर्बन मधुन फॉर्म भरुन घेवुन पिग्मी खातेचे पैसे मिळण्यास प्रारंभ झाला असून सर्वांचे पैसे चतुर्थी पर्यंत मिळणार अशी ग्वाही मिळाल्याने खातेदार खुश आहेत. परंतु मोठे खातेदार यापासुन वंचीत राहणार आहेत. सर्व सामान्यांना दिलासा देण्याचे एकंदरीत निष्कर्ष आहे. सावंतवाडी अर्बन बँकेचे माजी संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केलेल्या उपोषणाच्या भितीने का होईना बऱ्याच खात्यात पैसे वर्ग होत आहेत. खातेदारांनी दिलेल्या आपल्या बैंक डिटेल्स प्रमाणे युनीयन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, एसबीआय खात्यावर पैसे जमा होत आहेत. खातेदारांनी माजी संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचे आभार मानले आहेत.