उत्तम वाळके यांची संकल्पना
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील वाळके कुटुंबियांनी गणेश चतुर्थीनिमित्त आरती संग्रह प्रसिद्ध करून गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे.उत्तम वाळके यांच्या संकल्पनेनुसार हा आरती संग्रह प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आरती संग्रहात गणेशपूजन कसे करावे, गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कशी करावी यासंदर्भात माहिती देण्यात आली असून विविध आरती यामध्ये समाविष्ट आहेत. आरती संग्रह प्रकाशनवेळी उत्तम वाळके, सुनंदा अंकुश ढवण, चंद्रशेखर वाळके, महेंद्र वाळके,लक्ष्मीकांत वाळके, निलेश वाळके, हिमांशु वाळके आदी उपस्थित होते.